REVOLY RV AI ELECTRIC BIKE

REVOLT RV 400 – भारतातील पहिली AI-इलेक्ट्रिक बाईक

आजच्या आधुनिक काळात पेट्रोल आणि डिझेल च्या भरमसाठ वाढत्या किंमती मुळे सर्व सामान्य लोक पेट्रोल ची बाईक खरेदी करनं मुश्किल झालं आहे याला पर्याय म्हूणन REVOLT मोटर्स पर्यावरणपूरक आणि किफायतशीर सर्व सामान्य लोकांच्या खिशाला परवडणार आणि कमी मेटन्स असणार REVOLT RV 400 इलेक्ट्रिक बाइक  ही भारतातील पहिली AI-सक्षम इलेक्ट्रिक बाईक आहे ही बाईक मार्केट मध्ये धुमाकूळ घालत आहे. या बाईक बद्दल सविस्तर माहिती घेऊन.


REVOLT RV 400 चे वैशिष्ट्ये

Revolt RV 400 इलेक्ट्रिक मोटरसायकल ही बाईक युवकांना आणि सर्वसामान्य  लोकांच्या गरजा लक्षात घेऊन स्टायलिश आणि आधुनिक डिझाईनमध्ये तयार केली आहे मोठ्या शहरातील ट्रॅफिकमध्ये सहज चालवता येणारी ही बाईक हलकी आणि चालवायला सोपी आहे.


वैशिष्ट्ये

तपशील 

मोटर  

3 kW रेटेड पॉवर, 72 V, BLDC मोटर

बॅटरी

3.24 kWh लिथियम-आयन बॅटरी

रेंज

एको मोड 150 KMS ,नॉर्मल मोड 100 KMS , स्पोर्ट्स मोड , 85 KMS

टॉप स्पीड

85 km/h

चार्जिंग वेळ

4.5 तास (पूर्ण चार्ज), 50% चार्ज 3 तासांत

सस्पेन्शन 

 मागे मोनोशोक, समोर टेलिस्कोपिक

ब्रेकिंग

फ्रंट फोर्क्स अप साईड डाऊन , रियर सस्पेन्शन मोनोशॉक

वजन 

108 kg

स्मार्ट फीचर्स

ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, GPS, मोबाइल अँप (रिमोट मॉनिटरिंग, जिओ फेंसिंग

डिस्प्ले  

डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर

रंग पर्याय

रेड , ब्ल्यु ,ब्लॅक


REVOLT RV 400


बॅटरी आणि चार्जिंग

REVOLT RV400 इलेक्ट्रिक मोटरसायकल मध्ये 3.24kWh ची लिथियम आयन बॅटरी आहे.या बाईक  ला फुल चार्ज  होणास  सुमारे 4.5 तास लागतात. ही बाईक तुम्ही घरच्या चार्जिंग सॉकेटर वर चार्ज करता येते जर तुम्हाला चार्ज करण्यास वेळ नसेल तर तुम्ही REVOLT च्या स्स्वॅपेबल बॅटरी स्टेशनवर जाऊन तुम्ही बॅटरी चार्ज करून  घेऊ शकता.


कनेक्टिव्हिटी आणि स्मार्ट फिचर्स   

RV 400 इलेक्ट्रिक मोटरसायकल ही बाईक  केवळ गाड़ी नाही तर स्मार्ट फिचर्स आणि भरपुर कनेक्टिव्हिटी ची एक आधुनिक Al बेस्ड फिचर्स असणारी बाईक आहे.या मध्ये तुम्हाला डिजिटल कॅन्सोल,  ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी नेवीगेशन सिस्टीम ,कॉल आणि एसएमएस अलर्ट तुम्हाला तुमच्या डिस्प्ले कॅन्सोल वर मिळतो. तसेच यामध्ये रोड साईड असिस्टंट तसेच या मध्ये राडींग  हिस्टी, बॅटरी स्टेट्स  या सारखे अनेक सुविधा या बाईक मध्ये कंपनी उपलब्ध करून दिल्या आहेत जेणेकरून  बाईक चालवताना मजा येईल आणि  बाईक रायडिंग आनंद घेऊ शकाल.


REVOLT RV 400


सुरक्षा वैशिष्ट्ये

REVOLT  RV 400 इलेक्ट्रिक मोटरसायकल मध्ये  मध्ये बाईक सुरक्षे ची योग्य प्रकारे काळजी घेतली आहे. यामध्ये सस्पेन्शन फ्रंट फोर्क्स अप साईड डाऊन आहे आणि रियर सस्पेन्शन  मोनोशॉक दिलेले  आहे जे की बाईक साठी चांगली मानली जाते तसेच या बाईक मध्ये तुम्हाला  फ्रंट आणि रियर  साईड डिस्क ब्रेक दिले आहेत. ब्रेकिंग सिस्टम्स  CBS प्रणाली ने अद्ययावत केली आहे . या मध्ये तुम्हाला सेफ्टी स्टँडस देलेला आहे काही जण  घाई  मध्ये  स्टँडस  न बंद करता बाइक चालू  करून जाण्याचा जातात त्यामुळे  बाइक अपघात होण्याची शक्यता असते हे हार्डवेअर 90/80 फ्रंट आहे आणि 120/80 रियर टायर्समध्ये उपलब्ध आहे.


मायलेज आणि कामगिरी

RV400 इलेक्ट्रिक मोटरसायकल या बाइक मध्ये  तीन  मोड दिलेले आहे. या बाइक ची मायलेज स्पीड ही एको मोड ला 45 किमी /तास ,तसेच 150 KMS पर्यन्त  रेंज देते,नॉर्मल मोड ला ही बाइक  60  किमी /तास देते. आणि  100 KMS पर्यन्त रेंज देते .स्पोर्ट्स मोड ला ही  बाइक 85  किमी /तास देते. तसेच 85 KMS पर्यन्त  रेंज देते.


किंमत

REVOLT RV400 इलेक्ट्रिक मोटरसायकल या मध्ये  दोन मॉडेल आहेत . BRZ मॉडेल ,प्रीमियम मॉडेल याची किंमत खालील प्रमाणे ( किंमत ही प्रत्येक शहर नुसार बदलते )

REVOLT RV400  ( प्रीमियम मॉडेल
)

Ex‑Showroom₹1,49,950
EMPS Subsidy₹ -10,000
RTO₹1500
Insurance  (Comprehensive )₹5759
On‑Road Price ( kolhapur )₹1,47,209


REVOLT RV400  ( BRZ मॉडेल
 )

Ex‑Showroom₹1,42,950
EMPS Subsidy ₹-10,000
RTO ₹ 500
Insurance (Comprehensive)₹5640
On‑Road Price ( kolhapur )₹1,40,090

TVS Apache RR 310: आताच वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या!


मेंटेनन्स आणि सेवा सुविधा

RV400 इलेक्ट्रिक मोटरसायकल वाहन असल्याने मेंटेनन्स अगदी कमी आहे. पेट्रोल च्या बाइक च्या तुलेने या बाइक चा मेंटेनन्स खूप कमी आहे त्यामुळे या बाइक ला मागणी खुप आहे .कमी मेंटेनन्स आणि इलेक्ट्रिक वर चालणारी आणि दिसायला स्पोर्ट्स बाइक सारखी दिसते. REVOLT MOTORS  चे अधिकृत सर्व्हिस सेंटर आहे. तुम्ही बाइक ची सर्व्हिस बुकिंग REVOLT च्या मोबाईल अ‍ॅपद्वारे सुद्धा करू शकता.


REVOLT RV 400 साठी फायनान्स पर्याय

तुम्ही या बाइक ची खेरीदी  REVOLT MOTORS  च्या अधिकृत  वेबसाइट वर बूकिंग करू शकता या मध्ये तुम्हाला सर्व बँकांकडून फायनान्स सुविधा उपलब्ध आहे . ही इलेक्ट्रिक बाइक खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून सबसिडी दिली जाते . या मध्ये नो कॉस्ट EMI सुद्धा उपलब्ध आहे तुम्हा ला जवळ च्या REVOLT MOTORS  चे अधिकृत डीलर सेंटर ला भेट देऊ शकता . 


निष्कर्ष

जर तुम्ही नवीन आणि  स्मार्ट व  पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बाईक शोधत असाल, तर REVOLT MOTORS ची  RV400  ही बाइक तुमच्यासाठी  एक  चांगला  पर्याय असू शकतो . या बाइक मध्ये स्टाईल व  स्मार्ट फीचर्स, आणि चांगली परफॉर्मन्स  देणारी बाइक आहे आणि भविष्यात वाढणारे पेट्रोल चे दर पाहता ही बाइक योग्य मानली जाते. 


FAQs (नेहमी विचारले जाणारे प्रश्न)

  1. REVOLT RV 400 ची किंमत किती आहे

    सुमारे ₹1.4 लाख असून, राज्य सबसिडी नुसार किंमत बदलू शकते

  2. बाईकला पूर्ण चार्ज व्हायला किती वेळ लागतो?

    या बाइक ला फुल चार्ज  होणास  सुमारे 4.5 तास लागतात

  3. ही बाईक पाण्यात चालू राहते का?

    हो, बाईक IP67 रेटेड आहे म्हणजे ती पाण्यापासून सुरक्षित आहे

  4. REVOLT चे सर्व्हिस सेंटर कुठे आहेत?

    मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळुरू आणि  प्रमुख जिल्हा व शहरांमध्ये उपलब्ध आहेत

  5. REVOLT चे सर्व्हिस सेंटर कुठे आहेत?

    हो, ही बाइक खरेदी करण्यासाठी EMI पर्याय उपलब्ध आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Releated Posts

Kinetic DX+ 3.1 kWh: 132 किमी रेंजसह दमदार इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

86 / 100 Powered by Rank Math SEO SEO Score भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या…

ByByvijay Bhoje Sep 10, 2026

Simple Wave Electric Scooter: किंमत, रेंज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

86 / 100 Powered by Rank Math SEO SEO Score भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोलच्या…

ByByvijay Bhoje Sep 6, 2026

VIDA Vx2 Plus : पर्यावरणपूरक आणि पॉवरफुल इलेक्ट्रिक स्कूटर – सर्व माहिती मराठीत

83 / 100 Powered by Rank Math SEO SEO Score आजच्या काळात भरमसाठ वाढणारे पेट्रोल चे दर आणि…

ByByvijay Bhoje Aug 15, 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *