• Home
  • नवीन बाईक
  • TVS Apache RR 310: आताच वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या!
Tvs-apache-RR-310

TVS Apache RR 310: आताच वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या!

TVS MOTOR ने आपली लोकप्रय बाईक TVS Apache RR 310  ही Apache RR ही स्पोर्ट्स सेगमेन्ट मधील जबरदस्त फीचर्स  असणारी  एक प्रीमियम स्पोर्ट्स बाईक आहे. भारतात स्पोर्ट्स बाईक्सची लोकप्रियता वाढली आहे स्टाईल, स्पीड आणि पर्सनॅलिटी दर्शविण्याचे माध्यम बनली आहे. तरुण पिढीला आकर्षक लुक, दमदार इंजिन आणि वेगाची चाहूल लागते या  बाईकमध्ये अनेक आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश असून ती रायडिंगच्या अनुभवाला एक नवीन उंचीवर घेऊन जाते. भारतात स्पोर्ट्स बाईक्सची  लोकप्रियता दिवसेंदिवस चालली वाढत आहे .


TVS APACHE RR 310

TVS Apache RR 310 तांत्रिक माहिती व वैशिष्ट्ये

TVS Apache RR 310 ही स्पोर्ट्स बाईक 3 प्रकार आणि 3 रंगांमध्ये उपलब्ध आहे. TVS Apache RR 310 मध्ये 312.2cc इंजिन आहे जे 37.48 bhp ची पॉवर आणि 29 Nm टॉर्क विकसित करते. पुढील आणि मागील दोन्ही डिस्क ब्रेकसह, TVS Apache RR 310 मध्ये अँटी-लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम आहे. या Apache RR 310 बाईकचे वजन 174 किलो आहे आणि त्याची इंधन टाकी क्षमता 11 लिटर आहे.त्याचबरोबर ही बाईक ड्युअल चॅनल ABS, रायडिंग मोड्स, डिजिटल डिस्प्ले, LED हेडलाईट आणि अ‍ॅरोडायनामिक डिझाइनस येते.आधिक माहीतीसाठी टेबल पहा.


घटक

तपशील (Details)

इंजिन प्रकार

सिंगल सिलिंडर, 4-स्ट्रोक, 4-व्हॉल्व,

इंजिन क्षमता

312.2 c c

कूलिंग सिस्टिम

लिक्विड कूल्ड

लिक्विड कूल्ड

37.48 bhp @ 9800 rpm

मॅक्स टॉर्क

29 Nm @ 7900 rpm

गिअरबॉक्स

6-स्पीड गिअरबॉक्स

टॉप स्पीड

सुमारे 216 किमी/तास

रायडिंग मोड्स

Urban, Rain, Sport, Track

फ्रंट सस्पेन्शन

 Inverted Cartrideges Telescopic Fork

रिअर सस्पेन्शन

Two Arm Aluminium Die-cast Swingarm

ब्रेक्स (फ्रंट/रिअर)

300mm डिस्क / 240mm डिस्क (Dual Channel ABS)

टायर प्रकार

Tubeless, Michelin Road 5

मायलेज (सरासरी)

30 ते 35 किमी/लीटर

ड्राय वेट

174 किलो

डिस्प्ले

5” TFT स्क्रीन (Bluetooth, Navigation Support)

कनेक्टिव्हिटी

TVS SmartXonnect – कॉल, मेसेज, अलर्ट्स

कलर पर्याय

Sepang Blue ,Racing Red,Bomber Grey



 

TVS APACHE RR 310


Apache RR 310 ची मायलेज आणि इंधन टाकी

 Apache RR 310 ही कंपनी च्या सांगण्यानुसार ही बाइकसाधारणतः 30 ते 35 किमी/लीटर देते जी स्पोर्ट्स बाईकसाठी चांगली मानली जाते या बाइकची इंधन वाहून नेण्याची क्षमता 11 लिटर आहे.


Tvs apache RR 310 रायडिंग मोड्स

 TVS Apache RR 310 मध्ये चार राइडिंग मोड्स दिलेले आहेत.Urban,Rain,Sport,आणि Track हे मोड्स वेगवेगळ्या राइडिंग परिस्थितीनुसार इंजिनचे परफॉर्मन्स मध्ये (ABS), आणि थ्रॉटल रेस्पॉन्स कंट्रोल करता येते. प्रत्येक मोडचे फायदे दिले आहेत.

Rain Mode 
नावावरूनचं तुम्हाला समजेल असेल या मोड चा वापर पावसाळ्यात मध्ये केला जातो यामध्ये ABS अतिशय अ‍ॅक्टिव्ह असतो पाण्याने ओलसर झालेल्या रस्त्यांवर बाईक चालवता अधिक सुरक्षित वाटते या मोड ला थ्रॉटल कमी प्रतिसाद देतो जेणेकरून बाईक अचानक पॉवरस्पाइक होऊन बाइक स्लिप होत नाही.

Sport Mode 
या मोड मध्ये थ्रॉटल रेस्पॉन्स तीव्र असतो त्यामुळे तुम्हाला बाईक स्पीड वाढते.थ्रॉटल रेस्पॉन्स तीव्र असल्यामुळे तुम्हाला फास्ट अ‍ॅक्सलरेशन मिळते काहीच मिनिट मध्ये तुम्ही टॉप स्पीड गाठू शकता आणी या मोड ला इंजिन च्या फुल्ल पॉवर युटिलायझेशन बगायला मिळते

Track Mode 
या मोड चा वापर रेस ट्रॅक वर वापर केला जातो यामध्ये  इंजिन पूर्ण पॉवरवर काम करतं 34 HP पर्यंत वापर करता येतो ट्रॅक वर चांगली कंट्रोल आणि स्पीड मिळवण्यासाठी या चा थ्रॉटल अतिशय शार्प असतो. ABS मागच्या चाकावर कमी किंवा बंद होतो जेणेकरून प्रो रायडर्सना स्लाइड करता येते.

Urban Mode
Urban Mode हा रायडिंग मोड्स खास करून शहरांमध्ये बाईक चालविन्या साठी दिलेला आहे. सामान्य रस्त्यावर वर बाईक चालवताना थ्रॉटल रेस्पॉन्स सौम्य असतो, ज्यामुळे ट्रॅफिकमध्ये कंट्रोल करणे सोपे जाते.यामध्ये ABS सेन्सिटिव्ह असतो. त्यामुळे रस्त्यावर अचानक ब्रेक मारल्यावर बाईक घसरून पडायची शक्यता कमी होते


TVS Apache RR 310 ची ब्रेकिंग आणि सस्पेन्शन सिस्टिम

या बाईक मध्ये Dual Channel ABS ब्रेकिंग सिस्टिम प्रणाली वापरली आहेत Dual चॅनेल म्हणजे फ्रंट आणि रियर दोन्ही चाकांवर ABS चा वापर केला जातो हे सिस्टम हार्ड ब्रेकिंग दरम्यान चाकं लॉक होण्यापासून वाचवतो जेणेकरून बाइक स्लिप होत नाही आणि बाईक कंट्रोलमध्ये राहते.प्रत्येक राइडिंग मोडमध्ये ABS ची सेन्सिटिव्हिटी वेगळी असते

सस्पेन्शन सिस्टिम                               
फ्रंट सस्पेन्शन : Inverted Cartridges Telescopic Fork (USD Forks – Upside Down Forks) हे सस्पेन्शन स्पोर्टी राइडिंगसाठी डिझाइन केले आहे – ट्रॅक व स्ट्रीट दोन्हीसाठी योग्य आहे.फ्रंट सस्पेन्शन मुळे बाईक चालवताना स्टेबिलिटी मिळेते आणि राइडिंग कंट्रोल मध्ये राहते जेव्हा कॉर्नरिंग करताना.

रिअर सस्पेन्शन : Two-Arm Aluminium Die-Cast स्विंगरम हे मोटारसायकलच्या रिअर सस्पेन्शन सिस्टममधील एक महत्त्वाचा भाग आहे, जो बाइकच्या फ्रेमला रिअर व्हीलशी जोडतो. हे स्विंगआर्म मुख्यतः अल्युमिनियम डाय-कास्ट पद्धतीने बनवले जाते, ज्यामुळे ते हलके, मजबूत आणि कंपनशोषक आहे.


Apache RR 310 किंमत व ऑन-रोड प्राइस

Ex-showroom ₹ 2,77,999
RTO ₹ 33,360
Insurance (Comprehensive) ₹ 14,809
Other Charges ₹ 2,438

निष्कर्ष

TVS Apache RR 310 ही एक अशी बाईक आहे जी हाय परफॉर्मन्स बाइक आहे या बाइक मध्ये स्टाइल आणि आधुनिक फीचर्स यांचं उत्तम मिश्रण आहे. जर तुम्ही एक स्पोर्टी बाइक आणि डेली किंवा लॉन्ग राइड साठी योग्य बाईक शोधत असाल,जर तुमच्या बजेट मध्ये बसत असेल तर ही बाईक तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Releated Posts

Kinetic DX+ 3.1 kWh: 132 किमी रेंजसह दमदार इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

86 / 100 Powered by Rank Math SEO SEO Score भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या…

ByByvijay Bhoje Sep 10, 2026

Royal Enfield Himalayan 440: दमदार Adventure बाईक ची किंमत, मायलेज, इंजिन आणि स्पेसिफिकेशन्स

82 / 100 Powered by Rank Math SEO SEO Score भारतात Adventure Touring बाईक ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत…

ByByvijay Bhoje Sep 8, 2026

Simple Wave Electric Scooter: किंमत, रेंज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

86 / 100 Powered by Rank Math SEO SEO Score भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोलच्या…

ByByvijay Bhoje Sep 6, 2026
1 Comments Text
  • VIJAY says:

    HI

  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *