• Home
  • नवीन बाईक
  • MATTER AERA 2025 भारताची पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक बाइक मराठी मध्ये
MATTER-AERA AI BIKE

MATTER AERA 2025 भारताची पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक बाइक मराठी मध्ये

Spread the love

भारतात दिवसेंदिवस पेट्रोलचे दर वाढत आहेत .आणि त्याचबरोबर पर्यावरणावर होणारा परिणाम देखील गंभीर होत चालला आहे. त्यामुळे अनेक लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. अशा वेळी एक स्टायलिश, दमदार आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण इलेक्ट्रिक मोटरसायकल म्हणजेच MATTER AERA ही भारतीय  इलेक्ट्रिक  बाजारात एक गेम चेंजर ठरू शकते .  MATTER AERA  ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे जी भारतात तयार केली गेली आहे. ही मोटरसायकल भारतातील पहिली 4 स्पीड गिअरबॉक्स असलेली इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे. तिचा आधुनिक लुक, पॉवरफुल मोटर आणि अत्याधुनिक टेक्नोलॉजी यामुळे ती सध्या खूप चर्चेत आहे.

MATTER ही गुजरातस्थित एक टेक स्टार्टअप कंपनी आहे, जी ऊर्जा क्षेत्रात इनोव्हेशन साठी ओळखली जाते. त्यांनी भारतीय ग्राहकांसाठी खास डिजाईन केलेली MATTER AERA ही मोटरसायकल सादर केली आहे. ही मोटरसायकल संपूर्णतः भारतात तयार केली गेली आहे, जी “Make in India” चा एक आदर्श उदाहरण आहे. या कंपनीचे उत्पादन युनिट अहमदाबाद येथे आहे.


MATTER AERA

आकर्षक डिझाईन आणि स्टायलिश लुक

आधुनिक डिझाइन घटक
MATTER AERA  मोटरसायकल चा लुक अगदी स्टायलिश आहे. ही मोटरसायकल दिसायला एखादा  स्पोर्ट्स मोटरसायकल प्रमाणे दिसते.

एयरोडायनेमिक बनावट
मोटरसायकलची रचना एरो डायनॅमिक असून ती वेगाने चालवताना वाऱ्याचा प्रतिकार कमी करते, त्यामुळे मोटरसायकलची परफॉर्मन्स आणि रेंज वाढते.

रंग पर्याय
MATTER AERA मोटरसायकल विविध आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे, जसे की कॉसमिक ब्लॅक,ग्लासेर व्हाईट, नॉर्ड ग्रे, ब्लझे रेड, कॉसमिक ब्लू  इत्यादी . कलर मध्ये उपलब्ध आहे.


MATTER AERA


परफॉर्मन्स आणि पॉवर

11.5 kW इलेक्ट्रिक मोटर
या मोटरसायकल मध्ये 11.5 किलोवॉट पॉवर क्षमतेची मोटर वापरली आहे.

टॉप स्पीड
या मोटरसायकल  ची  टॉप स्पीड 105 किमी/तास देलेली आहे , जी आपल्या दैनंदिन कामासाठी  आणि  लहान  टूर साठी  योग्य आहे त्याचबरोबर  साहसी ड्रायव्हिंग चा  अनुभव देखील  घेता येतो . .

ड्रायविंग मोड्स
MATTER AERA या इलेक्ट्रिक मोटरसायकल  मध्ये तुम्हाला  तीन ड्रायविंग मोड देलेली आहे . ईको मोड , सिटि मोड , आणि स्पोर्ट्स मोड मध्ये उपलब्ध आहे. तुमच्या सोयीनुसार या मध्ये बदल करता येतो, जेणेकरून मोटारसायकल चालवता आनंद घेता येईल.


बॅटरी आणि रेंज

5kWh बॅटरी पॅक
MATTER AERA या इलेक्ट्रिक मोटरसायकल  मध्ये IP67 रेटेड 5 kWh लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. ही बॅटरी पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे.तसेच स्थिर बॅटरी  मध्ये येते, या मोटरसायकल बॅटरी तुम्हाला बाहेर काढता येत नाही. 

बॅटरी रेंज
MATTER AERA कंपनीच्या सांगण्यानुसार ही मोटरसायकल एकदा  पूर्ण चार्जवर ही मोटरसायकल सुमारे 172  किमी रेंज देते, 

चार्जिंग वेळ आणि पर्याय
मोटरसायकलसोबत फास्ट चार्जिंग आणि नॉर्मल चार्जिंग दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. फास्ट चार्जिंग द्वारे (0 – 100 % ) 2 तासात आणि  ( 0.- 80 %)  1.5 तासात मध्ये करु शकता . आणि नॉर्मल चार्जिंग द्वारे  ही मोटरसायकल0 – 100 % )  ६  तासत आणि   ( 0.- 80 %)  ५  तास मध्ये करता येते 

टेक्नोलॉजी आणि स्मार्ट फीचर्स
MATTER AERA या  मोटरसायकलमध्ये ७-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर टच स्क्रीन डिस्प्ले देण्यात आले आहे, ज्यावरून नेव्हिगेशन, गती, बॅटरी स्टेटस आणि कॉल नोटिफिकेशन पाहता येतात ब्लूटूथ आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी करता येते आपल्या स्मार्टफोन सोबत मोटरसायकल ब्लूटूथ द्वारा कनेक्ट करता येते. MATTER अ‍ॅपद्वारे वाहनाची माहिती मिळवता येते.  सॉफ्टवेअर OTA अपडेट्स द्वारा अपडेट्स केले जातात , ज्यामुळे नवीन फीचर्स मिळत राहतात.

सुरक्षा वैशिष्ट्ये
MATTER AERA या इलेक्ट्रिक मोटरसायकल  सिंगल चॅनेल एबीएस दिलेला आहे  या मध्ये मागील आणि पुढील   डिस्क ब्रेक्स दिलेला आहे , या मोटरसायकल मध्ये पुढील  सस्पेंशन टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील सस्पेंशन ट्विनशॉक अ‍ॅब्सॉर्बर दिलेला आहे ही मोटरसायकल IP65 रेटेड आहे, म्हणजे पावसाळ्यातही ही मोटरसायकल सुरक्षितपणे चालवता येते. या मोटरसायकल मध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट ,चावी मोटरसायकल शिवाय /अनलॉक होते  ,अँटी थेफ्ट सिस्टम ,रेवर्स मोड ,पार्किंग असिस्ट या सारखे अनेक आधुनिक सुविधा या मध्ये दिले आहेत


MATTER AERA


किंमत आणि उपलब्धता

ऑन-रोड किंमत
MATTER AERA ची किंमत ₹ 1,95,696 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. राज्य सबसिडी नुसार किंमत वेगळी असू शकते.

बुकिंग प्रक्रिया

ऑफिशियल वेबसाइट किंवा शो-रूमवर जाऊन ₹999 मध्ये प्री-बुकिंग करता येते.


इतर स्पर्धकांशी तुलना

Revolt RV400

RV400 कडे गियर नाही, परंतु किंमतीत थोडी स्वस्त आहे. परंतु MATTER AERA पॉवर आणि फिचर्स मध्ये वरचढ आहे.

Tork Kratos R

Kratos R मोटरसायकल प्रीमियम आहे पण AERA पेक्षा महाग आहे. MATTER ने चांगले फिचर्स कमी किमतीत दिले आहेत.

Ola S1 Pro
Ola S1 Pro एक स्कूटर असून त्यात गियर बॉक्स नाही. परंतु रेंज जास्त आहे.


निष्कर्ष

MATTER AERA ही मोटरसायकल फक्त इलेक्ट्रिक वाहन नाही, तर ती भारतातील मोटरसायकल क्षेत्रात एक क्रांती आहे. तिचे डिझाईन, परफॉर्मन्स, स्मार्ट फीचर्स आणि गिअर बॉक्ससारखी नवी इनोव्हेशन यामुळे ती भविष्यातील सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. जर तुम्ही स्टायलिश आणि पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटरसायकल शोधत असाल, तर MATTER AERA नक्कीच विचार करण्यासारखी आहे.


FAQs (नेहमी विचारले जाणारे प्रश्न)

  1. MATTER AERA ची रेंज किती आहे?

    एका चार्जवर ही मोटरसायकल सुमारे 125-150 किमी चालते.

  2. MATTER AERA मध्ये गिअर का दिले आहेत?

    गिअर मुळे पॉवर आणि टॉर्कवर अधिक नियंत्रण मिळते, त्यामुळे राइडिंग अनुभव पारंपरिक मोटरसायकल प्रमाणे मिळतो

  3. MATTER AERA कधीपासून उपलब्ध होईल?

    2025 च्या मध्यात ही मोटरसायकल डिलिव्हरीसाठी उपलब्ध होईल.

  4. बुकिंग कसे करता येते?

    ऑफिशियल वेबसाइटवर ₹999 भरून बुकिंग करता येते.

  5. ही मोटरसायकल पावसात वापरू शकतो का?

    होय, IP65 रेटिंगमुळे ही मोटरसायकल पावसात सुरक्षित आहे

Releated Posts

TVS Apache RTR 160 4V नवीन अपडेट : 3 Rides Modes आणि किंमत जाणून घ्या

Spread the love

Spread the love 84 / 100 Powered by Rank Math SEO SEO Score TVS Apache RTR 160 4V…

ByByveejay Apr 10, 2026

तुमच्या रायडला अपग्रेड करा : नवीन बाइक्समधील ५ अत्यावश्यक फीचर्स

Spread the love

Spread the love 73 / 100 Powered by Rank Math SEO SEO Score आजच्या मोटरसायकल्स पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट…

ByByveejay Apr 3, 2026

KTM 390 Adventure R खरी अ‍ॅडव्हेंचर मोटरसायकल 2026

Spread the love

Spread the love 87 / 100 Powered by Rank Math SEO SEO Score KTM 390 Adventure R ची…

ByByveejay Dec 24, 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *