• Home
  • नवीन बाईक
  • Hero Xoom 160 – एक परिपूर्ण स्पोर्टी स्कूटरची ओळख मराठी मध्ये
HERO XOOM 160

Hero Xoom 160 – एक परिपूर्ण स्पोर्टी स्कूटरची ओळख मराठी मध्ये

Spread the love

Hero MotoCorp ही भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे. त्यांनी 2024 Auto Expo मध्ये Hero Xoom 160 या नवीन 160 cc स्पोर्टी दुचाकी ची घोषणा केली होती. आणि सर्व दुचाकी प्रेमीचे लक्ष वेधून घेतले आहे . ही स्कूटर खास करून तरुण ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे, जे ट्रेंडी डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्सची अपेक्षा करतात.Hero ची ही नवीन स्कूटर ‘प्रीमियम स्कूटर’ सेगमेंटमध्ये येते. हि स्कूटर तयार करण्यासाठी कंपनीचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. Xoom 160 च्या माध्यमातून कंपनी 150cc+ स्कूटर श्रेणीतील स्पर्धेत मध्ये उतरत आहे.


HERO XOOM 160

Table of Contents

डिझाइन आणि लुक्स

आधुनिक आणि अ‍ॅग्रेसिव्ह डिझाइन

Xoom 160 चे डिझाइन खूप आक्रमक आणि भविष्यवादी आहे. पुढील बाजूस मस्क्युलर लुक देणारे बॉडी पॅनल्स देण्यात आहे आणि मागिल बाजूस आकर्षक लुक देण्यात आलेला आहे आणि धारदार LED DRLs दिले गेले आहेत, त्यामुळे स्कूटरला एक स्पोर्ट्स बाईक सारखा फील येतो.

एलईडी लाइट आणि स्पोर्टी फिनिश

या स्कूटर मध्ये ड्युअल साईड एलईडी हेडलॅम्प आणि टेल लॅम्प दिले आहे. Xoom १६० स्कूटर मध्ये स्पोर्टी लुक दिसण्यासाठी मॅट फिनिश दिली आहे. साइड पॅनल्स आणि फ्रंट वायझर देखील एरोडायनॅमिक स्टाईलमध्ये दिले आहेत.

कलर पर्याय आणि त्यांची वैशिष्ट्ये

या स्कूटर मध्ये ड्युअल साईड एलईडी हेडलॅम्प आणि टेल लॅम्प दिले आहे. Xoom १६० स्कूटर मध्ये स्पोर्टी लुक दिसण्यासाठी मॅट फिनिश दिली आहे. साइड पॅनल्स आणि फ्रंट वायझर देखील एरोडायनॅमिक स्टाईलमध्ये दिले आहेत.या मध्ये चार कलर पर्याय देले आहेत मॅट रेनफॉरेस्ट हिरवे ,मॅट राखाडी ,समिट व्हाइट ,कॅन्यन रेड या चार कलर पर्याय मध्ये स्कूटर उपलब्ध आहे.


इंजिन आणि परफॉर्मन्स

पॉवरफुल 160cc इंजिन

Hero Xoom 160 मध्ये 156cc लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे जे जवळपास 14.6 bhp @ 8000 rpm पॉवर जनरेट करते.

टॉर्क आणि पॉवर आउटपुट

हे इंजिन 14Nm @ 6500 टॉर्क मध्ये देण्यात आहे सिटी आणि हायवे रायडिंगसाठी योग्य आहे.

इंजिन तंत्रज्ञान आणि BS6 कंप्लायन्स

हे इंजिन BS6 स्टेज 2 (OBD2) मानकांशी सुसंगत आहे आणि हे पर्यावरणपूरक आहे.


HERO XOOM 160

रायडिंग एक्सपीरियन्स

शहरात व हायवेवर रायडिंग परफॉर्मन्स

Xoom 160 ची राइड क्वालिटी शहरातील ट्रॅफिकमध्ये सहज आणि आरामदायक आहे, तर हायवेवर ती वेगाने सुसाट धावते.

सस्पेन्शन आणि हँडलिंग

फ्रंटला टेलिस्कोपिक हायड्रॉलिक शॉक अ‍ॅब्सॉर्बर आणि रियरला डबल शॉक शोषक देण्यात आले आहे. त्यामुळे स्कूटर अधिक स्टेबल आणि कम्फर्टेबल आहे.

ब्रेकिंग सिस्टीम

 सिंगल चॅनल  abs ब्रेकींग सिस्टिम दिले आहे फ्रंट डिस्क ब्रेक आणि रिअर ड्रम ब्रेक मध्ये देण्यात आले आहे.


टेकनॉलॉजी आणि फीचर्स

डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर

या HERO XOOM 16 मध्ये डिजिटल स्पीडोमीटर डिस्प्ले कन्सोल दिलेला आहे या मध्ये तूम्हाला मध्ये स्पीड, ट्रिप मीटर, फ्युएल इंडिकेटर, Bluetooth स्टेटस आणि कॉल/एसएमएस अलर्ट्स इ . या मध्ये फीचर्स दिलेले आहेत. जेणेकरून तुम्हाला आरामदायक राईड करता येईल.

कनेक्टिव्हिटी फीचर्स (Bluetooth, Navigation)

आपण आपल्या स्मार्टफोन मध्ये Hero Connect अ‍ॅप डाऊनलोड करून स्मार्टफोन कनेक्ट करू शकता या मध्ये तुम्ही स्मार्टफोन वर राईडिंग ची स्थिती आणि कधी सर्व्हिस केला आहे याची माहिती अ‍ॅप मधून मिळते तसेच या मध्ये टर्न बाय टर्न नेव्हिगेशन दिलेले आहे.स्मार्ट की दिलेली सोबत रिमोटनी सीट ओपन होते .


इंधन कार्यक्षमता

मायलेज तपशील

HERO XOOM 160 च्या कंपनी च्या दिलेल्या माहिती नुसार, HERO XOOM 160 चा मायलेज ४० किमी प्रतिलिटर आहे. तो २५% स्कूटरपेक्षा चांगला मायलेज देते


सेफ्टी फीचर्स

ABS ब्रेकिंग प्रणाली

या मध्ये सुरक्षित ब्रेकिंग साठी फ्रंटला डिस्क ब्रेक आणि सिंगल चॅनल ऍब्स मध्ये देण्यात आला आहे या स्कूटर ड्युअल चेंबर एलईडी हेडलॅम्प दिलेला आहे त्या सोबत एलईडी पोझिशन लॅम्प देण्यात आले आहे.


HERO XOOM 160

कंफर्ट आणि युटिलिटी

सीटिंग पोझिशन आणि राइडिंग कंफर्ट

या स्कूटर मध्ये वाइड आणि सॉफ्ट सीट दिली आहे , या स्कूटर एर्गोनॉमिक हँडलबार आणि रबर ग्रिप्स स्कूटर रायडिंगला आरामदायक बनवतात.

अंडरसीट स्टोरेज आणि युटिलिटी हुक्स

या मध्ये ड्युअल युटिलिटी हुक्स, अंडरसीट हेल्मेट स्टोरेज आणि USB चार्जिंग पोर्ट देलेला आहे .


स्पर्धात्मक तुलना

Hero Xoom 160 vs Aprilia SXR 160

Aprilia मध्ये अधिक स्पोर्टी फील येते , पण Xoom मध्ये किफायतशीर किंमत व फिचर्सचा बॅलन्स आहे.

Hero Xoom 160 vs Yamaha Aerox 155

Aerox चा इंजिन अधिक पॉवरफुल आहे , पण Xoom मध्ये आरामदायक सीटिंग आणि बजेट कमी असणाऱ्या साठी उत्तम पर्याय आहे .



किंमत आणि उपलब्धता

एक्स-शोरूम किंमत

Hero Xoom 160 ची शोरूम किंमत ₹1.48 लाख (एक्स-शोरूम) आहे. या स्कूटर ऑन रोड किमत शहरानुसार बदलते . अंदाजे किमीत 1.70 लाख ते 1.80 लाख पर्यंत असू शकते या स्कूटर बूकिंग तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन करू शकता . स्कूटर बूकिंग अधिकृत वेबसाइट HERO XOOM 160


फायदे आणि तोटे

Hero Xoom 160 चे प्रमुख फायदे

  • आधुनिक लुक्स 
  • टेक्नो-फ्रेंडली फीचर्स 
  • आरामदायक राइड 
  • Hero ची विश्वसनीय सर्व्हिस नेटवर्क 

काही मर्यादा आणि तोटे

  • काहीजणांना ABS ची कमतरता वाटू शकते 
  • स्पोर्टी स्कूटरसाठी किंमत थोडी जास्त वाटू शकते 

ग्राहकांचे प्रतिसाद आणि रिव्ह्यू

सोशल मीडिया आणि यूट्यूब रिव्ह्यूज

लोक Xoom 160 च्या लुक्स आणि फीचर्सवर खुश आहेत. अनेकांनी ‘पैशे वसूल’ स्कूटर म्हणत कौतुक केलं आहे.

वापरकर्त्यांचे अनुभव

प्रारंभीचे ग्राहक रायडिंग कंफर्ट आणि स्मार्ट फीचर्सवर खूप समाधान व्यक्त करत आहेत.


निष्कर्ष

Hero Xoom 160 ही फक्त एक स्कूटर नाही, ती एक परफॉर्मन्स आणि स्टाईल यांचा उत्कृष्ट मेळ आहे. जर तुम्ही प्रीमियम स्कूटर शोधत असाल, जी कंफर्ट, टेकनॉलॉजी, आणि परफॉर्मन्स यांचे संतुलन साधते . तर हि स्कूटर तुमच्या साठी Hero Xoom 160 योग्य पर्याय आहे.


FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

Hero Xoom 160 ची किंमत किती आहे?

Xoom 160 ची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹1.30 लाख आहे.

Hero Xoom 160 ला ABS आहे का?

हो, या मध्ये सिंगल चॅनल ABS मिळण्याची शक्यता आहे.

या स्कूटरचा टॉप स्पीड किती आहे?

Hero Xoom 160 चा टॉप स्पीड अंदाजे 100-110 km/h आहे.

Hero Xoom 160 कधीपासून उपलब्ध आहे?

2025 च्या पहिल्या तिमाहीपासून डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे.

हीरो झूम 160 ची सर्व्हिस इंटरव्हल काय आहे?

प्रत्येक 3000-5000 किमी अंतरानंतर सर्व्हिस करणे शिफारस केले जाते.

Releated Posts

TVS Apache RTR 160 4V नवीन अपडेट : 3 Rides Modes आणि किंमत जाणून घ्या

Spread the love

Spread the love 84 / 100 Powered by Rank Math SEO SEO Score TVS Apache RTR 160 4V…

ByByveejay Apr 10, 2026

तुमच्या रायडला अपग्रेड करा : नवीन बाइक्समधील ५ अत्यावश्यक फीचर्स

Spread the love

Spread the love 73 / 100 Powered by Rank Math SEO SEO Score आजच्या मोटरसायकल्स पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट…

ByByveejay Apr 3, 2026

KTM 390 Adventure R खरी अ‍ॅडव्हेंचर मोटरसायकल 2026

Spread the love

Spread the love 87 / 100 Powered by Rank Math SEO SEO Score KTM 390 Adventure R ची…

ByByveejay Dec 24, 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *