भारतीय दुचाकी उत्पादक कंपनी TVS ने नेहमीच भारतीय स्पोर्ट्स बाईक मार्केट मध्ये नाव कमावले आहे. Apache मालिका ही TVS ची सर्वात लोकप्रिय सिरीज आहे, आणि आता या मालिकेत एक नवीन सदस्य येतो नवीन आणि बहुप्रतीक्षित मोटरसायकल, टीव्हीएस अपाचे आरटीएक्स 300, ऑक्टोबर 2025 महिन्यात भारतात लॉंच करण्याच्या तयारीत आहे TVS Apache RTX 300. ही मोटरसायकल टीव्हीएसची ॲडव्हेंचर-टूर श्रेणीतील पहिली बाइक आहे ही बाईक केवळ पॉवरसाठीच नव्हे तर तंत्रज्ञान आणि डिझाईनसाठी देखील चर्चेत आहे. ही मोटरसायकल भारतीय दुचाकी प्रेमींसाठी एक नवीन अनुभव घेऊन येणार आहे या बाइक बद्दल माहिती घेऊ

वैशिष्ट्ये आणि डिझाइन
स्पोर्टी आणि एरोडायनॅमिक डिझाईन
TVS Apache RTX 300 चा डिझाईन बघताच तिची स्पोर्टी ओळख स्पष्ट होते. पुढील बाजूला आकर्षक LED हेडलॅम्प्स, शार्प टँक डिझाईन आणि मागील भागात स्लिक टेल-सेक्शन दिले आहे. RTX 300 मध्ये फुल-LED सेटअप आहे हेडलाइट्स, टर्न इंडिकेटर्स आणि टेल लॅम्प्स. DRLs मुळे बाईकला आधुनिक आणि प्रीमियम लुक मिळतो.TVS RTX 300 मध्ये मेटॅलिक रेड, ब्लॅक, आणि मॅट ब्लू असे तीन मुख्य कलर ऑप्शन्स मिळू शकतात. त्यासोबत स्पोर्टी ग्राफिक्स हे बाईकला आकर्षक बनवतात.हे रायडर्सना लांब पल्ल्याच्या रायडिंग आराम देण्यासाठी डिझाइन केले आहे, प्रामुख्याने टूरिंगवर लक्ष केंद्रित केले आहे.
इंजिन आणि परफॉर्मन्स
इंजिन स्पेसिफिकेशन
RTX 300 मध्ये 299 सिंगल सिलिंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन बसवले आहे. हे इंजिन BS6 Stage 2 b मानकांसह येते.या बाईकमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिपर क्लच देखील असेल
पॉवर आणि टॉर्क
हे इंजिन 35.PS पॉवर आणि 28. 5 Nm टॉर्क निर्माण करते. हे आकडे 300cc सेगमेंटमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स देतात.
लिक्विड-कूलिंग आणि स्लिपर क्लच
लिक्विड-कूलिंगमुळे इंजिन तापमान नियंत्रित राहते. स्लिपर क्लच मुळे गिअर शिफ्टिंग अधिक स्मूद होते आणि रायडिंग अनुभव अधिक स्थिर राहतो.
तंत्रज्ञान आणि फिचर्स
डिजिटल TFT डिस्प्ले
TVS Apache RTX 300 मध्ये फुल कलर TFT डिस्प्ले दिलेला आहे, ज्यात राईड मोड्स, स्पीड, गिअर पोजिशन आणि फ्युएल माहिती दिसते. TVS ची Smart Connect तंत्रज्ञानामुळे मोबाइल अॅपद्वारे कॉल अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि ट्रिप डेटा पाहता येतो. Urban, Sport, आणि Rain असे तीन राईड मोड्स दिले आहेत. नेव्हिगेशन सपोर्टमुळे लाँग ट्रिप्स अधिक सोयीस्कर होतात.

फीचर्स
TVS च्या पहिल्या अॅडव्हेंचर बाईकमध्ये स्टील ट्रेलिस फ्रेम, इन्व्हर्टेड फोर्क्स आणि ॲडजस्टेबल मोनोशॉक सस्पेंशन असेल. ती 19-इंच फ्रंट आणि 17-इंच रिअर अलॉय व्हील्सवर चालेल आणि ड्युअल-पर्पज ट्यूबलेस टायर्स असतील. स्विचेबल ड्युअल-चॅनेल एबीएस देखील अपेक्षित आहे
मायलेज आणि परफॉर्मन्स बॅलन्स
शहरात TVS Apache RTX 300 सुमारे अंदाजे 28-30 kmpl तर हायवेवर 35 kmpl पर्यंत मायलेज देते आजून आधिकृत माहिती आलेली नाही परफॉर्मन्स आणि इंधन कार्यक्षमता यांचा संतुलित मेळ यात दिसतो.
हे देखील वाचा
TVS Apache RR 310: आताच वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या!
Yezdi Adventure 2025 : दमदार लुक, पॉवरफुल इंजिन आणि नवीन टेक्नॉलॉजी!
किंमत
TVS Apache RTX 300 ची अपेक्षित किंमत ₹2.80 लाख – ₹3.10 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते.
स्पर्धकांशी तुलना
या बाईकचे मुख्य प्रतिस्पर्धी Yamaha MT-03, KTM Duke 250, आणि BMW G 310 R आहेत. RTX 300 किंमत आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने स्पर्धात्मक ठरते.
निष्कर्ष
TVS Apache RTX 300 ही फक्त बाईक नाही, तर भारतीय रायडर्ससाठी एक नवीन अनुभव देणारी बाइक आहे. ही बाइक लवकरच बाइक प्रेमी च्या भेटी साठी येत आहे या स्पोर्ट्स बाईकचा परफॉर्मन्स आणि कम्फर्ट दोन्ही देते. जर येणारी नवीन 300cc सेगमेंट मधील बाइक शोधत असाल जी बाइक पॉवर, स्टाईल आणि तंत्रज्ञानाचा संगम असेल , तर TVS RTX 300 तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.
1. TVS Apache RTX 300 कधी लॉन्च होणार आहे?
कंपनी च्या माहिती प्रमाणे अपेक्षित लॉन्च तारीख ऑक्टोबर 2025 महिन्यात आहे.
2. RTX 300 ची किंमत किती असू शकते?
सुमारे ₹2.8 लाख ते ₹3.1 लाख (एक्स-शोरूम).
3. ही बाईक RR 310 पेक्षा कशी वेगळी आहे?
RTX 300 ही स्ट्रीटफायटर व्हर्जन आहे, ज्यात कम्फर्ट आणि हँडलिंग सुधारित आहे.
4. मायलेज किती मिळते?
सुमारे 28-35 kmpl पर्यंत.
5. RTX 300 मध्ये कोणते तंत्रज्ञान आहे?
TFT डिस्प्ले, SmartConnect, राईड मोड्स आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम.













