आजच्या काळात भरमसाठ वाढणारे पेट्रोल चे दर आणि पर्यावरणाचे होणारे आतोनात नुकसान या मुळे इलेक्ट्रिक वाहने ही सध्या काळाची गरज बनली आहे. HERO मोटोकॉर्प या दुचाकी बनवनाऱ्या लोकप्रिय कंपनी ने या स्पर्धेत उडी घेतली आहे . त्यांनी VIDA Vx2 Plus ही नवीन जनरेशन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे.
या लेखात आपण VIDA Vx2 Plus ची सविस्तर माहिती वैशिष्ट्ये, किंमत, फायदे आणि इतर पर्यायांशी तुलना पाहणार आहोत. VIDA Vx2 Plus ही HERO मोटोकॉर्पची इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी स्थापन केलेली उपकंपनी आहे. भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आता हरित ऊर्जेकडे वळली आहे आणि VIDA Vx2 Plus हे त्याचे स्पष्ट उदाहरण आहे.
VIDA Vx2 Plus ही शहरी वापरकर्त्यांसाठी डिझाइन केलेली आहे. कमी वजन, स्टायलिश डिझाईन, आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तयार केलेली ही स्कूटर आहे ,हि स्कूटर तुह्माला होणाऱ्या खर्च आणि पर्यावणनाचे होणारे नुकसानी पासून वाचवते.

VIDA Vx2 Plus चे डिझाईन आणि लूक
VIDA Vx2 Plus चे डिझाईन आणि लूक आधुनिक आणि स्मार्ट डिझाईन केला आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटरचे फ्युचरिस्टिक डिझाईन मध्ये तयार केली आहे, या मध्ये तुम्हाला हेडलाइट्स LED दिले आहे यामुळे स्कूटरचा संपूर्ण लूक आकर्षक दिसतो. या मध्ये सात कलर मध्ये उपलब्ध आहे ,या मध्ये नेक्सस ब्लू ,मेटॅलिक ग्रे, मॅट पांढरा , नारंगी , मॅट लेंमन ,ब्लॅक रेड या कलर उपलब्ध आहे या स्कूटर बांधणीची गुणवत्ता स्कूटरची बिल्ड क्वालिटी एकदम मजबूत आहे . रस्त्यावरील धक्क्यांना सहजपने झेलू शकते. याची फ्रेम स्टील मध्ये आहे. आणि यांचे पेंट फिनिश प्रीमियम दर्जाचे आहे.
VIDA Vx2 Plus बॅटरी आणि रेंज
या मध्ये लिथियम आयन बॅटरी दिलेले आहे. विदा व्हीक्स२ मध्ये 3.4 के व्ही क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी दिली गेली आहे हि बॅटरी IP67 रेटिंगसह जलरोधक आहे.हि स्कूटर एकदा चार्ज केल्यावर IDC 142 किलोमीटर ची रेंज देते. या मध्ये अर्थात, राइडिंग मोड, वेग आणि रस्त्याच्या परिस्थितीवर ही रेंज बदलू शकते. या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये तुम्ही बॅटरी काढता येते . त्यामुळे तुम्ही ती सहजपणे घरात चार्ज करू शकता.

VIDA Vx2 Plus चार्जिंग पर्याय
या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये तीन प्रकार ची चार्जिंग सुविधा दिली आहे. हि स्कूटर विदा चार्जिंग स्टेशन वर फास्ट चार्जिंग करण्यासाठी ( 0 – ८० % ) चार्जे करण्यासाठी ६० मी लागता आणि तसेच ( 0 – ८० % ) हा ४ तास १३ मी लागतात . या स्कूटर ला नॉर्मल घरच्या 5A सॉकेटवरसुद्धा स्कूटर सहज चार्ज होते. एकूण चार्जिंग वेळ अंदाजे 4.5 तास आहे. आणि तुम्ही बॅटरी काढून बॅटरी चार्जिंग स्टेशन चार्जिंग करू शकता.
टेक्नॉलॉजी आणि स्मार्ट फीचर्स
या स्कूटरमध्ये आकर्षक ४.३ इंच चा TFT डिजिटल डिस्प्ले दिला गेला आहे या डिस्प्ले वर आणि ब्लूथू कनेक्टिव्हिटी दिले आहे ज्यावर तुम्ही स्पीड, रेंज, बॅटरी स्टेटस, GPS वगैरे बघू शकता.या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मध्ये मोबाईल अॅप सपोर्ट करते. विदा मोबाईल अॅपच्या माध्यमातून तुम्ही स्कूटर ट्रॅक करू शकता, लॉक/अनलॉक करू शकता आणि राइडिंग हिस्टरीही पाहू शकता.या इलेक्ट्रिक OTA अपडेट्स दावारे सॉफ्टवेअर अपडेट OTA (Over-the-Air) येतात, म्हणजे स्कूटर नेहमी अप-टू-डेट राहते.

सुरक्षा आणि ब्रेकिंग सिस्टम
विदा व्हीक्स २ मध्ये (सीबीएस) एकत्रित ब्रेकिंग सिस्टम दिले गेले आहे .या दोन्ही चाक मध्ये डिस्क ब्रेक दिले आहेत जेव्हा रायडर ब्रेक वापरतो तेव्हा सीबीएस पुढील आणि मागील दोन्ही ब्रेक लावते त्यामुळे स्कूटर थांबण्याची शक्ती आणि सुरक्षितता वाढते या मध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणाली वापरली आहे रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे गती कमी होत असताना ऊर्जा पुनर्प्राप्त होते, बॅटरी रिचार्ज होते आणि कार्यक्षमता सुधारते. हिरो व्हिडा व्हीएक्स२ प्लस इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये टर्न बाय टर्न सिग्नल इंडिकेटर सह अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये दिले आहेत.
स्टोरेज आणि युटिलिटी
VIDA Vx2 मध्ये २७.२ लिटर ची सीट खाली स्टोरेज दिला आहे, जिथे हेल्मेट, बॅग किंवा चार्जर आणि पाणी बॉटल ठेवता येतो. या मध्ये तुम्हाला सोयीस्कर असे फ्रंट कंपार्टमेंट सुद्धा दिले आहे. USB चार्जिंग पोर्ट आणि सामान ठेवण्यासाठी मल्टीपल हुक्स दिले आहेत चाव्या, केबल्स, चार्जर किंवा एक छोटासा नाश्ता. समोरचा क्यूबी त्यांना जवळ ठेवता येते आणि शोधणे सोपे जाते.
किंमत आणि उपलब्धता
VIDA Vx2 ची ऑन-रोड किंमत भारतात आहे सुमारे ₹९५ ,००० हजार ते ₹ १,००,००० लाख पर्यंत असू (राज्यानुसार सबसिडी नुसार फरक पडतो).या मध्ये VIDA Vx2 बास मॉडेल ची कीमत ₹५०,००० हजार ते ₹ ६०,००० हजार पर्यंत असू शकते ही स्कूटर ईएमआय आणि सरकार ची सबसिडी योजना चे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. ही स्कूटर हीरो च्या अधिकृत शोरूम मध्ये उपलब्ध आहे
ग्राहकांचे अभिप्राय आणि रिव्ह्यू
रिअल युजर अनुभव बहुतेक ग्राहकांनी स्कूटरचे रेंज, लूक, आणि टेक्नॉलॉजीबाबत समाधान व्यक्त केले आहे. शहरी वापरासाठी ही स्कूटर उत्तम मानली जाते. या स्कूटरचे सोशल मीडिया आणि यूट्यूब रिव्ह्यूज YouTube वर VIDA Vx2 चे अनेक सकारात्मक रिव्ह्यू आहेत. अनेक रिव्ह्यूअर्सनी स्कूटरच्या स्थिरतेचे आणि सॉफ्टवेअर फिचर्सचे कौतुक केले आहे.
हे ही वाचा
Suzuki E Access नवीन मॉडेल 2025 प्राइस, फीचर्स आणि लॉन्च डिटेल्स मराठी मध्ये
VIDA Vx2 ची पर्यावरण पूरकता प्रदूषण विरहित प्रवास
VIDA Vx2 मुळे कोणतेही कार्बन उत्सर्जन होत नाही, त्यामुळे पर्यावरणपूरक प्रवास शक्य होतो. ग्रीन एनर्जीचा उपयोग सोलर एनर्जीवर बॅटरी चार्ज केल्यास 100% ग्रीन मोबिलिटी शक्य आहे.
कोणासाठी योग्य आहे VIDA Vx2?
शहरातील वापरासाठी ही स्कूटर सर्वोत्तम मानली जाते ही स्कूटर ट्रॅफिकमध्ये सहज वापरता येते, आणि पार्किंगला कमी जागा लागते, ऑपरेट करणे सोपे आहे. कॉलेज विद्यार्थी, ऑफिस गोअर्स यांच्यासाठी ही स्कूटर फायदेशीर आहे या स्कूटर खर्च कमी आहे या दिसायला स्टायलिश लूक आहे आणि स्मार्ट फीचर्समुळे ही स्कूटर युवक आणि युवतीना आकर्षित करत आहे .
निष्कर्ष
VIDA Vx2 ही एक आधुनिक, स्मार्ट, आणि परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. HERO सारख्या विश्वसनीय ब्रँडकडून आल्यामुळे तिचा दर्जा आणि सेवा उत्तम आहे. जर तुम्ही शहरी भागात वापरण्यासाठी परवडणारी आणि स्मार्ट स्कूटर शोधत असाल, तर VIDA Vx2 एक चांगला पर्याय ठरू शकतो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
VIDA Vx2 ची टॉप स्पीड किती आहे?
80 किमी/तास इतकी आहे.
VIDA Vx2 ची बॅटरी चार्ज करायला किती वेळ लागतो?
होम चार्जरने 4.5 तास आणि फास्ट चार्जरने 65 मिनिटात 80%.
ही स्कूटर पावसात चालते का?
हो, बॅटरी IP67 रेटेड असल्याने पावसात वापर करता येतो.
हो, बॅटरी IP67 रेटेड असल्याने पावसात वापर करता येतो.
साधारणतः 4-5 वर्षे किंवा 700-800 चार्ज सायकल्स.
VIDA इलेक्ट्रिक स्कूटरची सर्व्हिसिंग किती वेळा करावी लागते?
१. पहिली सेवा – १,००० किमी किंवा १ महिन्यासाठी
२. दुसरी सेवा – ७,५०० किमी किंवा ६ महिन्यांसाठी
३. तिसरी सेवा – १५,००० किमी किंवा १२ महिन्यांसाठी













