भारतातील टूरिंग अॅडव्हेंचर सेगमेंटमध्ये आता आणखी एक दमदार मोटरसायकल ब्रॅंड नव्या रूपात भारतात परत आलं आहे.ती म्हणजे Yezdi adventure 2025 बाइक या बाइक ची मोटरसायकल प्रेमींमध्ये विशेष स्थान असलेल्या Yezdi ब्रँडने आपल्या नवीन अॅडव्हेंचर बाइकसह पुन्हा एकदा चर्चेत आली आहे . नवीन मॉडेलमध्ये अनेक आधुनिक फीचर्स, शक्तिशाली इंजिन आणि आकर्षक डिझाइन यांचा समावेश आहे. चला तर मग, जाणून घेऊया या दमदार बाईकबद्दल सविस्तर माहिती.

डिझाईन व लूक :
Yezdi adventure ची डिझाईन व लूक पूर्णपणे अॅडव्हेंचर टूरिंग ची गरज लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या बाइकला एक रग्गड आणि दमदार लूक देण्यासाठी स्टील फ्रेम, मोठा विंडस्क्रीन, ड्युअल Abs मध्ये आहे, आणि रगड मॅट फिनिश दिलं आहे.या बाइक मध्ये दोन प्रकार मध्ये उपलब्ध आहे. एक single head light आणि twin head light मध्ये उपलब्ध आहे ही बाइक दिसायला आकर्षक आहे बघताच क्षणी कोणीही बाइक च्या प्रेमात पडतील असा बाइक चा लुक तयार केला आहे. ही बाइक सात रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे
इंजिन व परफॉर्मन्स –
Yezdi adventure मध्ये 334 CC च लिक्विड-कूल सह सिंगल सिलिंडर आहे . तसेच 4 स्टोर्क मध्ये आहे.जे तुम्हाला अधिक शक्ति 29.16 bhp @ 8000 rpm आणि अधिक टोर्क अंदाजे 29.56 Nm @ 5800 rpm देते. या बाईक मध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे. या बाइकची ऑफ रोड क्षमता उत्तम असून उंच ग्राऊंड क्लिअरन्स मुळे बाईक आणखी जरा स्टॅलिश दिसते आणि बाईक च्या मजबूत सस्पेन्शन प्रणालीमुळे खडतर रस्त्यांवरही बाईक चालवताना आरामदायक वाटते.
फीचर्स व तंत्रज्ञान
या बाईक मध्ये फीचर्स व तंत्रज्ञान देताना कंपनी ने कोणतीही कमकरता सोडली नाही.या मध्ये डिजिटल TFT डिस्पले देण्यात आलेला आहे तसेच या बाइक मध्ये GPS नेव्हिगेशन दिलेले आहे.या बाइक मध्ये मोबाइल फोन कनेक्टिविटी आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट सुद्धा दिलेला आहे.
वैशिष्ट्ये तपशील इंजिन प्रकार 4-स्ट्रोक, लिक्विड-कूल्ड, DOHC, सिंगल सिलेंडर इंजिन क्षमता 334cc कमाल शक्ती (Max Power) अंदाजे 29.16 bhp @ 8000 rpm कमाल टॉर्क (Max Torque) अंदाजे 29.56 Nm @ 5800 rpm गिअरबॉक्स 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन फ्रंट सस्पेन्शन टेलिस्कोपिक फोर्क्स ø41mm रिअर सस्पेन्शन लिंकेज आणि ७ स्टेप अॅडजस्टेबल प्री-लोडसह मोनोशॉक अॅब्सॉर्बर ब्रेक्स (समोर/मागे) डिस्क ब्रेक (ABS सह) टायर (समोर/मागे) ट्युब टायर – स्पोक व्हील्स फ्युएल टॅंक क्षमता सुमारे 15.5 लिटर ग्राउंड क्लीयरन्स अंदाजे 220 मिमी सिटींग टूरिंग साठी आरामदायक सीट डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हो, नेव्हिगेशन, ट्रिप मीटर, गिअर पोझिशन इंडिकेटर ABS प्रकार ड्युअल चॅनल ABS LED लाइट्स हेडलाइट, टेल लाईट आणि टर्न इंडिकेटर LED चार्जिंग पॉइंट हो (USB चार्जिंग) कलर पर्याय ग्रे, ब्लू, कॅमो आदी रंग उपलब्ध अनुमानित किंमत (शोरूम किंमत) ₹2.17 लाख ते ₹2.50 लाख (वाढ होऊ शकते)
हे सर्व फीचर्स रायडिंग अनुभव अधिक सुरक्षित आणि स्मार्ट बनवतात.
कम्फर्ट व रायडिंग अनुभव :
या बाइक मध्ये लॉंग ट्रॅव्हल सस्पेन्शन दिल्या असल्यामुळे लॉंग राइड साठी योग्य मानली जाते या मध्ये तुम्हाला आरामदायक सीटिंग पोझिशन दिली आहे या मध्ये पाठीमागील सीट साठी चांगली सीटिंग स्पेस दिली आहे.यामुळे पाठी मागील सीट वर बसणार हा आरामदायक बसू शकतो तुम्ही ही बाइक बाइक ट्रेकिंग, टूरिंग आणि दररोजच्या वापरासाठी योग्य आहे सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स देखील तुलनात्मकदृष्ट्या सोपं आहे.
इंधन कार्यक्षमता
Yezdi adventure 2025 मध्ये 334 CC च लिक्विड-कूल सह सिंगल सिलिंडर आहे . तसेच 4 स्टोर्क मध्ये आहे जे तुम्हाला अधिक शक्ति 29.16 bhp @ 8000 rpm आणि अधिक टोर्क अंदाजे 29.56 Nm @ 5800 rpm देते ही बाइक 28-32 किमी/लीटर इतकी सरासरी मायलेज देते (रायडिंग स्टाईल नुसार थोडाफार बदल होतो). या बाइक अंदाजे 15.5 लिटर इंधन टाकी दिलेले आहे लांब पल्ल्याची ठिकाणी जाताना वारंवार पेट्रोल भरण्याची गरज भासत नाही.
स्पर्धात्मक तुलना
Yezdi adventure 2025 ची थेट स्पर्धा ही Royal Enfield Himalayan 450 आणि KTM 250 Adventure आणि Hero XPulse 400 यांसोबत होते या बाइक च्या मनाने Yezdi adventure 2025 ही फीचर्स, किंमत आणि डिझाईनच्या बाबतीत ही एक चांगली पर्याय ठरु शकतो
किंमत व उपलब्धता
भारतामध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹2.17 लाखांपासून सुरू होते.आपल्या शहरानुसार बाइक कीमत ही चेंज होऊ शकते ही बाइक कंपनी च्या अधिकृत डीलरशिप मध्ये ही बाईक बुकिंगसाठी उपलब्ध आहे तर काही शहरांमध्ये टेस्ट रायडिंग सुविधा देखील मिळत आहे.तसेच कंपनी अधिकृत वेबसाइट बूकिंग ची सुविधा उपलब्ध आहे
हे ही वाचा.
TVS Apache RR 310: आताच वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या !
निष्कर्ष
जर तुम्ही अॅडव्हेंचर रायडिंगचे शौकिन असाल, तर Yezdi adventure ही बाइक तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते . या बाइक मध्ये पॉवर, फीचर्स, डिझाईन आणि कंफर्ट यांचा उत्कृष्ट समतोल कंपनी ने साधला आहे.Yezdi आपल्या परंपरेला आधुनिकतेच्या नव्या वाटांशी जोडून दिलेलं आहे या बाइक सोबत एक नवा प्रवास घडू शकतो.
FAQs (सर्वसामान्य प्रश्न):
येझदी अॅडव्हेंचर 2025 ची किंमत किती आहे .
भारतात एक्स-शोरूम किंमत अंदाजे ₹2.30 लाख पासून सुरू होते
या बाईकचे मायलेज किती आहे ?
ही बाईक सुमारे 28 ते 32 किमी/लीटर इतके मायलेज देते.
येझदी अॅडव्हेंचर 2025 मध्ये कोणते फीचर्स आहेत ?
डिजिटल डिस्प्ले, नेव्हिगेशन, Bluetooth कनेक्टिव्हिटी, ड्युअल चॅनल ABS, USB चार्जर इत्यादी
ही बाइक कोणासाठी योग्य आहे ?
ही बाइक अॅडव्हेंचर, ट्रेकिंग व टूरिंगसाठी योग्य असून ऑफ-रोड आणि हायवे दोन्हीसाठी उत्तम आहे
याचे स्पर्धक कोण आहेत
Royal Enfield Himalayan, KTM Adventure आणि Hero XPulse यांच्याशी ही बाईक स्पर्धा करते
आपण ही बाइक खरेदी करणार का? किंवा आधी टेस्ट रायडिंग घेणार? तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की कळवा !