भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमत आणि पर्यावरणाचे वाढते प्रदूषण थांबवणासाठी सरकार कडून इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी मिळणारे प्रोत्साहनामुळे लोक आता इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी वळत आहेत. भारतील इलेक्ट्रिक वाहना ची मागणी पाहता भारतातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय ब्रँड सुझुकी ही नामवंत कंपनी आपली प्रसिद्ध स्कूटर Access 125 चे इलेक्ट्रिक रूप म्हणजेच Suzuki E Access नवीन मॉडेल सादर करण्याच्या तयारीत आहे.
ही स्कूटर केवळ पारंपरिक Access चं इलेक्ट्रिक व्हर्जन नसून, तिच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, स्मार्ट फीचर्स आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स असणार आहे. चला तर मग Suzuki E Access या आगामी इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल सविस्तर माहिती घेऊया.
Suzuki E Access ची डिझाईन
Suzuki ने e-Access या बाईक मध्ये डिझाईन प्रीमियम लुक दिलेला आहे.
1) आकर्षक डिझाइन :
Suzuki e-Access मध्ये तुम्हाला ड्युअल टोन पेंट दिलेला आहे, यामुळे बाइक आकर्षक आणि स्टायलिश मध्ये दिसते,या बाइक मध्ये मोठे LED DRL हेडलाइट्स दिले आहे, इंडिकेटर्समुळे आजून आधुनिक आणि हाय-टेक फील येते.
2) कम्फर्ट आणि प्रीमियम सुविधा :
या बाइक मध्ये तुम्हाला आरामदायक रुंद सीट आणि मागील सीट वर बसणाऱ्यांसाठी मजबूत फूटरेस्ट दिलेला आहे हाय-क्वालिटी ग्रीप रेल दिलेली आहे चढताना उतरताना सुरक्षितता वाटते.
3) स्मार्ट टच :
Suzuki e-Access मध्ये तुम्हाला मल्टी इन्फॉर्मेशन कलर टीएफटी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे,या मध्ये बॅटरी लेवल , सरासरी अवरेज एनर्जी consumption, तसेच ओडोमीटर, ड्रायव्हिंग मोड सेटिंग आणि किलोमीटर डिस्प्ले मध्ये दिसते. तसेच यामध्ये नेव्हिगेशन कॉल आणि एसएमएस अलर्ट सुद्धा तुम्हाला मिळतो.
4) रियल डिझाईन : Suzuki E Access मध्ये तुम्हाला मागील बाजू सुद्धा साधी आणि सिम्पल डिझाईन पाहायला मिळते. ती दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक दिसते. या सुझुकी इ एक्सेस मध्ये डिझाईन मध्ये पारंपरिक सह आधुनिकतेचा सुंदर संगम केला आहे, जो नव्या आणि जुन्या दोन्ही ग्राहकांना आवडेल.

Suzuki E Access ची बॅटरी व परफॉर्मन्स वैशिष्ट्ये
Suzuki E Access मध्ये lithium iron Phosphate ( LFP) मध्ये दिली आहे.या मध्ये बॅटरी 4.1kw दिली आहे.बॅटरी रेंज एकदा फुल चार्जवर 90 ते 95 किमी दिली आहे
वैशिष्ट्ये | तपशील |
बॅटरी व्होल्टेज | 51.2 V |
कमाल पॉवर | 4.1 Kw |
कमाल टॉर्क | 15 Nm |
EV बॅटरी प्रकार | लिथियम आयर्न फॉस्फेट (LFP) |
फिक्सिंग प्रकार | फिक्स्ड |
बॅटरी क्षमता | 60 Ah, 3.072 kWh |
रेंज | 95 किमी (AIS 040 नुसार) |
ऊर्जा वापर | 39 Wh/km (AIS 039 नुसार) |
चार्जर प्रकार | ऑफ-बॉर्ड टाइप, सिंगल-फेज AC 200-240V 50/60Hz |
चार्जिंग वेळ (पोर्टेबल चार्जर) | 0-80% – 4 तास 30 मिनिटे (तापमान 25 डिग्री) 0-100% – 6 तास 42 मिनिटे (तापमान 25 डिग्री |
चार्जिंग वेळ (फास्ट चार्जर | 0-80% – 1 तास 12 मिनिटे 0-100% – 2 तास 12 मिनिटे |
फ्रेम प्रकार | अंडरबोन |
आधिक माहिती साठी तुम्ही कंपनी च्या अधिकृत वेबसाइट भेट द्या . Suzuki E Access
Suzuki E Access ची फिचर्स व तंत्रज्ञान
Suzuki E Access मध्ये अनेक स्मार्ट फीचर्स उपलब्ध आहे. या मध्ये तुम्हाला Bluetooth कनेक्टिव्हिटी दिलेली आहेत मोबाईल अॅपद्वारे स्कूटरचे डेटा ट्रॅकिंग करता येतो. या मध्ये नेव्हिगेशन सुविधा दिली आहेत स्मार्ट डिस्प्लेवर दिशा दाखवणारी सुविधा दिली आहे.या मध्ये Keyless Start Stop ची सुविधा दिली आहे. तसेच मल्टी फंक्शन स्टार्टर स्विच दिले आहे. तसेच या मध्ये चार्जिंग इनलेट लीड लॉक फंक्श, फ्रंट साईड चार्जिंग पोर्ट आणि सेंटर स्टॅन्ड, साईड स्टॅन्ड दिले आहेत या सर्व फीचर्समुळे ही स्कूटर केवळ इको-फ्रेंडली नाही तर टेक्नॉलॉजी-फ्रेंडली आहे.
Suzuki E Access सुरक्षा वैशिष्ट्ये
Suzuki E Access ने सुरक्षेमध्ये कोणतेही तडजोड केली नाही या मध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टिम (CBS) दिलेला आहे समतोल ब्रेकिंग साठी याचा उपयोग होतो या फ्रंट साईड डिस्क ब्रेक दिला आहे रिअर साईड ला ड्रम ब्रेक दिला आहे. दोन्ही चाका साठी 12 इंच फ्रंट अँड रिअर two tone Effect दिला आहे.ट्यूबलेस टायर्स दिलेले आहेत.फ्रंट साईड ला Telescopic, Coil Spring ,Oil Damped सस्पेन्शन दिले आहेत तर रिअर साईडला Swingarm type, coil spring, oil damped सस्पेन्शन दिले आहे. शहरातील दररोजच्या प्रवासासाठी आवश्यक असलेली सुरक्षितता या Suzuki E Access मध्ये दिले आहेत
हे ही वाचा
REVOLT RV 400 – भारतातील पहिली AI-इलेक्ट्रिक बाईक
किंमत व लॉंच तारीख
Suzuki E Access चे किंमत अजून जाहीर झालेली नाही कंपनी च्या संगण्यानुसार अपेक्षित किंमत: ₹1.05 लाख ते ₹1.20 लाख (एक्स-शोरूम) असू शकते ही बाइक कधी लॉंच होईल. याची माहिती कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा नाही, पण 2025 च्या दुसऱ्या सहामाहीत लॉन्च होण्याची शक्यता आहे. ही बाइक मार्केट मध्ये अनेक इलेक्ट्रिक स्कूटर शी थेट स्पर्धा करत आहे . ही स्कूटर खालील स्पर्धक स्कूटर्सना टक्कर देऊ शकते
| मॉडेल | रेंज | किंमत (₹) |
| TVS iQube | 100 किमी | 1.08 लाख |
| Ola S1 Air | 125 किमी | 1.04 लाख |
| Ather 450S | 115 किमी | 1.17 लाख |
Suzuki ब्रँडची विश्वासार्हता आणि दर्जा लक्षात घेतल्यास E Access स्पर्धकांपेक्षा अधिक आकर्षक ठरू शकते.
निष्कर्ष
Suzuki e-Access ही स्कूटर पारंपरिक Access 125 चा पर्यावरणपूरक, टेक्नोलॉजिकल आणि कार्यक्षम अवतार आहे. ज्या ग्राहकांना विश्वासार्ह ब्रँड, आरामदायक राइडिंग आणि चांगले फीचर्स हवे आहेत, त्यांच्यासाठी ही स्कूटर उत्तम पर्याय ठरू शकते. जर तुम्ही शहरात रोज 40-50 किमी प्रवास करत असाल आणि पेट्रोल खर्च टाळू इच्छित असाल, तर Suzuki E Access ही स्कूटर तुमच्यासाठी उत्तम निवड ठरेल.
(FAQs) वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Suzuki e-Access ची रेंज किती आहे?
एका पूर्ण चार्जमध्ये सुमारे 90 ते 95 किमी.
चार्जिंगला किती वेळ लागतो?
नॉर्मल चार्जिंग (0-80%) 4 hrs 30 मी तासांपर्यंत (0-100%) – 6 hrs 42 mins
Suzuki e-Access भारतात कधी लॉन्च होणार?
कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा नाही, पण 2025 च्या दुसऱ्या सहामाहीत लॉन्च होण्याची शक्यता आहे.
याची किंमत किती असेल?
अंदाजे ₹1.05 ते ₹1.20 लाखांच्या दरम्यान (एक्स-शोरूम).